पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Rakesh Jhunjhunwala Story:5000 te16000 करोड चा प्रवास.(warren Buffett of india)

इमेज
आज आपण एका अशा व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी भारतीय shear market मधे आपली अशी छाप पाडली कि, आज त्यांना भारतीय shear market चा राजा मानलं जातं आहे. मित्रांनो, त्यांचं नाव आहे " rakesh jhunjhunwala" (राकेश झुनझुनवाला).   Shear market म्हणजे काय..?  Shear market च ज्ञान नसणारे याला जुगार म्हणतात. पण shear market जुगार नसून, तो एक व्यवसाय आहे. Shear म्हणजे "हिस्सा" जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे shear विकत घेता. तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे हिस्सेदार बनता. समजा एखाद्या कंपनीचे एक लाख shear विकायला आहे. आणि तुम्ही त्यातून दहा हजार shear घेतले. म्हणजेच तुम्ही त्या कंपनीत 10%हिस्सेदार झालात.  मित्रांनो, "rakesh jhunjhunwala" यांनी shear market मधे 5000 रुपयांपासून सुरुवात केली होती. आज त्यांच्याकडे 16000 हजार करोड रुपये आहेत. आणि आज परिस्थिती अशी आहे कि, ते एकटेच shear market मधे उलथापालथ करू शकतात. कारणं भरपूर investor त्यांच्याच मार्गावर पाय ठेऊन चालतात. भारतीय श्रीमंतांच्या यादीत त्यांचं नाव 53 नंबरला आहे.  सुरुवात..  "Rakesh jhunjhunwala" यां...

बाल कलाकार माऊली.आणि त्याच मन मोहून टाकणार हार्मोनियम वादन

इमेज
देवाने माणसाला दिलेलं एक वरदान म्हणजे संगीत. सुख असो किंवा दुःख. दोन्ही काळात आपल्याला जर कोण साथ देत असेल.? तर ते आहे संगीत. "कला असे मानवासी भूषण" माणसाकडे एखादी तरी कला असावी. एखादा तरी गुण असावा. हल्ली आपल्याला गुण नाही पण अवगुण असलेले पाहिजे तेवढे भेटतील.  संगीत आपल्याला जगायला शिकवतं. संगीत आपल्याला माणसात देव शोधायला शिकवतं. संगीत माणसाला माणसाशी जोडत. संगीतामध्ये एवढी ताकत आहे, कि मोठमोठे आजार सुद्धा संगीत ऐकल्यामुळे दूर झाले.  एखादी कला अवगत करायची असेल, तर त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. काहींना अगदी थोड्या कालावधीत संगीत साध्य होत. तर काहींना वर्षानुवर्षे मेहनत घेऊनही ते साध्य करता येत नाही.  आळंदी या तीर्थक्षेत्री, महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरून दरवर्षी हजारो विद्यार्थी, अध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी येतात. प्रत्येकाची आवड वेगळी. कुणाला पखवाज शिकायचा असतो, कुणाला गायन, तर कुणाला कीर्तनकार व्हायचं असत. पण आळंदीला येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात जास्त संख्या पखवाज शिकणाऱ्यांची.  आळंदीला आल्यावर, पखवाज शिकण्यासाठी क्लास कोणाकडे लावायचा? हा एक किचक...

स्वराज्यासाठी रक्त सांडणारी काही मुख्य मराठी घराणे.Maratha warrior

इमेज
मुघली सत्ता उलथून टाकणारी काही मुख्य मराठी घराणे.  मुघल सत्तेच्या अत्याचाराला त्रासलेल्या या महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात हिंदवी स्वराज्य स्थापन करून, मराठी सत्तेचा पाया रचला. अठराव्या शतकात संबंध हिंदूस्थानात मराठी सत्तेचा विस्तार झाला. इतिहासात, हा कालखंड मराठी सत्तेच्या परम प्रभुत्वाचा कालखंड म्हणून इतिहासकारांनी गौरविला आहे. मराठ्यांची सत्ता 1818 पर्यंत टिकली होती.  भारतातील इतर प्रांतातील लोकांना, मुघल सत्तेला झुगारून देता आलं नाही. ते काम मराठयांनी केल. मराठ्यांनी, मुघलांच्या अत्याचारी सत्तेला झुगारून, संपूर्ण हिंदुस्थानभर मराठी सत्ता स्थापन केली.  मुघलांना पळवून लावण्याच काम मराठ्यांनी केल. त्यामधील काही मुख्य मराठी घराणे.  1)भोसले घराणे  2)पवार घराणे  3)शिंदे घराणे  4)आंग्रे घराणे  5)गायकवाड घराणे  6)दाभाडे घराणे  7)पटवर्धन घराणे  8)होळकर घराणे  9)पेशवे घराणे  भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपलं रक्त सांडणारा प्रत्येकजण मराठाच होता.  वर दिलेल्या मराठी...

चला थोडं हसुया (भाग दोन )

इमेज
मित्रांनो.. असं म्हणतात कि, हसल्याने आयुष्य वाढतं आणि हसवल्याने आयुष्याचं महत्व. चला तर मग आपणही हसुया.आणि इतरांनाही हसवुया.  शिक्षक (एका मुलाला)-सांग, शून्यापेक्षा लहान संख्या आहे का..?  मुलगा - हो सर, आहे.  शिक्षक - कोणती.  मुलगा - टिंब  शिक्षक - सांगा, सर्वात नशीला पदार्थ कोणता..?  पप्पू - पुस्तक सर, उघडल्या बरोबर झोप येते.  पहिला मित्र - यार मी माझ्या बहिणीची डायमंड रिंग चोरून गर्लफ्रेंडला दिली.  दुसरा मित्र - मुर्खा, दोन दिवस हमाली केली आणि ती डायमंड रिंग घेऊन दिली होती तुझ्या बहिणीला.  पहिला मित्र - अरे रागावतो कशाला, तुझ्या बहिणीलाच तर दिली.  प्रेमिका - तुला माहित आहे, उद्या माझा बर्थडे आहे, काय गिफ्ट देणार मला..?  प्रियकर - जे तु मागशील ते.  प्रेमिका - मला रिंग पाहिजे.  प्रियकर - ठिक आहे, रिंग देतो पण कॉल उचलू नको. कारणं माझ्या फोनमधे बॅलेन्स कमी आहे.  नवरा आपल्या रुसून गेलेल्या बायकोला रोज फोन करायचा.  एक दिवश त्याची सासू.  सासू - तुम्हाला किती वेळा सांगितलं, कि आता ती तुमच्या घरी येणार नाही. तरी पण...

फेसबुक वापरणाऱ्यांनो सावधान तुमच्या सोबत होऊ शकतो हा धोका.facebook

इमेज
 फेसबुक वापरणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा..  जगात सर्वात जास्त वापरली जाणारी social media साईट म्हणजे facebook. आज प्रत्येकजण facebook चा वापर करतो.  Facebook चा वापर अनेकजण चांगल्या कामासाठी करतात. Facebook मुळे अनेकांना एक व्यासपीठ दिल. Facebook ने अनेकांना समाजात चांगली ओळख दिली.  पण आता facebook  वापरणाऱ्यांसाठी धोक्याची बातमी आहे. हॅकर्सद्वारे सर्व facebook account क्लोनिंग केले जातं आहे. तुमच नाव, तुमचा फोटो आणि तुमच्या अकाउंट वरील माहितीचा वापर, तुमच्या अकाउंट सारखंच दुसरं अकाउंट बनवण्यासाठी केला जातं आहे.अकाउंट बनवल्या नंतर त्यामध्ये आपल्या मित्रांना ऍड केल जातं आहे. आपल नाव आणि आपला फोटो पाहून, आपले मित्र त्या अकाउंटची रिकवेस्ट एकसेप्ट करतात.  आपल्या नावाचा, आपल्या अकाउंटचा गैरवापर केला जाऊ शकतो. आपल्या नावाखाली, हॅकर्स फेसबुकवर काहीही लिहू शकतात. अश्लील, जातीवाद निर्माण होईल अशी पोस्ट, धार्मिक पोस्ट केली जाऊ शकते. यामुळे आपल्याला कायदेशीर कारवाईला तोंड देण्याची वेळ येऊ शकते. म्हणून आपल्या अकाउंटचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी घ्या.  खबरदारी म्...

गुरुवर्य कुरेकर बाबांनी दिला कोरोना लस संपूर्ण सुरक्षित असल्याचा दाखला. Corona vaccine

इमेज
साधकांचे मायबाप असणारे, शांतिब्रम्ह मारोती महाराज कुरेकर बाबांनी कोरोना लस (corona vaccine)घेऊन, लस सुरक्षित असून, सर्वांनी लस घ्यावी असा संदेश दिला.  संपूर्ण जगाला त्रासदायक ठरलेल्या corona ची लस निर्माण झाली आणि कुठेतरी एक आशेच किरण आपल्याला दिसायला लागल. पण एखाद्या गोष्टीला विरोध नाही झाला, असं इतिहासात बघायला मिळत नाही. अगदी corona ची लस निर्माण झाली आणि तिला सुद्धा बराच विरोध झाला. आता तो विरोध का झाला, याची कारणं वेगवेगळी. पण याचा परिणाम असा झाला. कि सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला. लस घ्यावी का नाही. एकीकडे corona मुळे मारणाऱ्या माणसांची संख्या वाढतच आहे आणि एकीकडे लस घ्यावी कि नाही घावी हा संभ्रम मनात आहे.  समाजातील तज्ज्ञ लोकांनी जनतेला लसीचे महत्व पटवून दिले. लस घ्या म्हणून आवाहन केल, विनंती केली. आम्ही लस घेतली तुम्ही पण घ्या. लस पूर्ण सुरक्षित आहे असं वारंवार सांगण्यात आलं.  आता अशातच, corona लस संपूर्ण सुरक्षित असल्याचा अजून एक दाखला मिळाला. तो म्हणजे, वारकरी संप्रदायातील सर्व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान, साधकांचे मायबाप, शांतिब्रम्ह, गुरुवर्य, मारोती ...

मनात घर करणारी, मनातून निघालेली भावना.Marathi Shayari

इमेज
आपल्या आयुष्यात नेहमी असे प्रसंग येतात. कि ज्यामुळे आपल्याला सुखदुःखाची जाणीव होते. आणि यातूनच आपल्या मनामध्ये एखादी कविता, एखादी शायरी, एखाद गीत निर्माण होत. खरंतर तो प्रत्येकाचा अनुभव असतो. एखाद्याला थोडी वेदना झाली कि तो त्यावर काहितरी सहज बोलतो किंवा लिहितो. आणि त्यालाच आपण कविता, गीत, किंवा शायरी म्हणतो. असेच काही मनातून निघालेले, मनाला भुरळ पडणारे विचार.  वेदना..  पाळता येत नाही आणि टाळता येत नाही...  काही केल्या सांभाळता येत नाही... फेकता येत नाही किंवा विकता येत नाही...  तिच्यासोबत जगूनही जगता मात्र येत नाही... !! भावना..  नकळत हाती घेतलेला हात, अगदी असाच असावा, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...  किमान एवढी एकतरी भावना, माझ्या मनाची, पोहचावी तुझ्यापर्यंत... काळजी..  काळजी करू नको, असं सांगणार कुणी असलं म्हणजे, माणूस जास्त काळजी करायला लागतो.  मान-अपमान..  परक्यांनी दिलेला "मान", आणि आपल्यानी केलेला "अपमान " माणूस कधीच विसरत नाही...  तुम्हाला हा लेख कसा वाटला. कमेंट करून सांगा. आणि Marathi Sahitya या ब्लॉगला followe करा. 

श्री विठ्ठलाचा पाळणा

इमेज
श्रीविठ्ठलाचा पाळणा  पहिल्या दिवशी आनंद झाला | टाळ मृदंगाचा गजर केला || चंदन बुक्क्याचा सुवास त्याला | पंढरपुरात रहिवास केला |जो | दुसऱ्या दिवशी करुनि आरती | दिंड्या पताका वैष्णव नाचती || वरती बैसविला लक्ष्मीचा पती || जो. || तिसऱ्या दिवशी दत्ताची छाया | सुंदर किती हो बाळाची काया || आरती ओवाळू जय प्रभुराया || जो. || चवथ्या दिवशी चंद्राची छाया | पृथ्वी रक्षण तव कराया || चंद्रसूर्याची बाळावर माया || जो. || पाचव्या दिवशी पाचवा रंग | लावुनी मृदंग आणि सारंग || संत तुकाराम गाती अभंग || जो. || सहाव्या दिवशी सहावा विलास | बिलवर हंड्या महाली वास || संत नाचती गल्लोगल्लीत || जो. || सातव्या दिवशी सात बहिणी | एकमेकींचा हात धरोनि || विनंती करिती हात जोडोनि || जो. || आठव्या दिवशी आठवा रंग | गोप गौळणी झाल्या त्या दंग || वाजवी मुरली उडवितो रंग || जो. || नवव्या दिवशी घंटा वाजला | नवखंडातील लोकं भेटीला || युगे अठ्ठावीस उभा राहिला || जो. || दहाव्या दिवशी दहावीचा थाट | रंगीत फरश्या टाकिल्या दाट || महाद्वारातून काढली वाट || जो. || अकराव्या दिवशी आकार केला | सोन्याचा कळस शोभे शिखराला || रुख्मिणी बैसली डाव...

चला थोडं हसुया. Marathi comedy

इमेज
असं म्हणतात कि माणसाने नेहमी आनंदी राहावं. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधावा. कारणं हसल्याने आयुष वाढतं. एवढ्या सोप्या पद्धतीने जर आयुष्य वाढत असेल तर आपण सुद्धा नेहमी आनंदी राहूया. हसुया आणि हसवुया.  जिंदगी गम का सागर भी हैं,  "हसके "उस पार जाणा पडेगा.  जीवनात दुःख चालूच राहणार. पण आलेल्या दुःखाला हसत सामोरं जायचं आणि आनंदी राहायचं.  तुम्हाला हसवण्यासाठी याठिकाणी मी काही विनोद शेअर करणार आहे. आणि तुम्हाला हसायलाच लावणार आहे. तुम्ही सुद्धा याचा आनंद घ्या. आणि आपल्या मित्रांनाही हसवा.  सासू : तुला स्वयंपाक करता येत नाही ?   सुनबाई : नाही . सासू : मग तु हे लग्नाआधी का नाही सांगितलं ?  सुनबाई : तुम्हाला सरप्राईज द्यायचं होत म्हणून.. ! पेशंट : कोरोनाची लस दंडालाच का देतात ?  डॉक्टर : कारणं दुसरीकडं दिली तर तुम्हाला फोटो काढून स्टेटसला ठेवता येणार नाही.  दोन बाया बसमध्ये जागेसाठी भांडत होत्या. त्यांचं भांडण ऐकून कंडक्टर म्हणाला, "तुमच्या दोघीत जी म्हातारी असेल तर बसेल". बिचाऱ्या शेवटपर्यंत उभ्या राहू गेल्या.  गेलं तरी चालतील माझ डोळं, पण...

प्रेम म्हणजे काय.? प्रेमाची खरी व्याख्या करणारा लेख.real love

इमेज
तुम्ही केलंय का कुणावर प्रेम...?  जगामध्ये अशी एकही व्यक्ती नसेल, ज्याचं/जिचं कोणावर प्रेमच नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक पुरुषाच आणि प्रत्येक स्त्रीच कुणावर तरी प्रेम असतंच.त्या प्रेमाची व्याख्या प्रत्येकजण आपल्या मनाप्रमाणे करतो. सध्याच्या काळात तर प्रेमाची भाषाच बदलून टाकली आपण (मी नाही). प्रेम फक्त एका मुलाने एका मुलीवर करायचं. सोबत फिरायचं. सोबत राहायचं. शरीराचा उपभोग घ्यायचा. बस.. झालं प्रेम.  प्रेमाची खरी व्याख्या करायची झाली, तर प्रेम म्हणजे दोन आत्म्यांच मिलन. कोण कधी कोणाला आवडेल. आपल्या हृदयात कोण कोणाला जागा देईल. याविषयी कोणीच काही बोलू शकत नाही. कारणं प्रेम सहज होत असत.ठरवून जे केल जातं ते प्रेम नसतं, तर प्रेमाच्या नावाखाली केलेला तो एक व्यवहार असतो.  प्रेम एखाद्याचा चेहरा पाहून नाही केल जातं. प्रेमामध्ये सत्यता असायला हवी. विश्वास असायला हवा. प्रेमात हे महत्वाचं नाही, कि ज्याला आपण पसंद करतो. त्याने सुद्धा आपल्याला पसंद करावं. अरे प्रेम तर कुणावरही होऊ शकत. प्रेम आई वडिलांवर होऊ शकत. प्रेम भावा बहिणीवर होऊ शकत. प्रेम नातेवाईकांवर होऊ शकत. प्रेम मित्रांवर ह...

परिवार आपला कि आपल्या धनाचा. आपल्या जीवनातील कटू सत्य

इमेज
परिवार आपला कि आपल्या धनाचा...  मित्रांनो, आपण ज्यांना आपलं समजतो, ते खरोखर आपले आहे का..? याचा आपण कधी विचार केला का..? या जगात आपलं कोण आणि परकं कोण, हे कधी कळतं..? जेव्हा आपल्यावर एखाद संकट येत तेव्हा. संकटात साथ देणारेच आपले असतात हे खरं. पण मित्रांनो जेव्हा एखाद्यावर मृत्यूचं संकट येत. तेव्हा त्याच्यासोबत कोण असत..? याचा विचार आपण कधी करतच नाही.  जेव्हा एखाद्या व्यक्तीची मृत्यू होते. तेव्हा त्याच्यासोबतच त्याच्या सर्व वस्तू घराबाहेर काढल्या जातात. ज्या कपड्यावर तो झोपायचा, जे कपडे तो घालायचा, त्याने ज्या वस्तू वापरल्या, त्या सर्व वस्तू त्याच्या बॉडी बरोबरच बाहेर काढतात. पण एका गोष्टीच निरीक्षण केल, कि मग आपल्या लक्षात येईल कि, त्याने कमावलेला पैसा, धनदौलत, मात्र घरातच असते. ते बाहेर अजून तरी कोणी काढलं नाही. उलट त्याच्या गळ्यातील चैन, बोटात असलेली अंगठी, खिशात असलेले पैसे काढून घेतात.  याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते कि, आजपर्यंत जे आपल्याला आपलं समजत होते. खरंतर ते आपल्या पैशांमुळे आपल्याला जवळ करत होते. म्हणून तर माणसाची बॉडी बाहेर काढली जाते. पण त्याने कमावलेलं धन...

आपल्यालाही होईल श्रीकृष्णाची भेट. एक सत्य घटना

इमेज
प्रिय वाचकांनो. जगामध्ये भक्ती करणारे खूप आहेत. प्रत्येकजण आपापल्या आराध्याची भक्ती करतो. प्रत्येकाचं आराध्य दैवत वेगळं, प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धतही वेगळी.भक्ती मात्र प्रत्येकजन करतो. मग आपण एवढी भक्ती करतो. रोज देवाची पूजा करतो. साऱ्या देवांची पूजा करतो. तरी पण अजून आपल्याला देवाची भेट का होत नाही. हा प्रश्न आपल्या मनात येणं साहजिकच आहे.  या प्रश्नाच उत्तर आपल्याला नक्कीच, हा लेख वाचल्यावर कळणार. एका व्यक्तीच्या जीवनातील ही घटना. आपल्याला शिकवते कि, भक्ती कशी असावी. कशाप्रकारे भक्ती केली म्हणजे ती देवापर्यंत पोहचेल.  एक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये खूप दुःखी असायची. एक दिवस त्याचा मित्र त्याला भेटला आणि त्याला सांगितलं कि, तुझ्या जीवनामध्ये असलेलं दुःख जावं असं जर तुला वाटत असेल, तर तु श्रीकृष्णाची पूजा कर. नक्कीच तुला श्रीकृष्ण भेट देतील.  त्या व्यक्तीने श्रीकृष्णाची एक मूर्ती विकत आणली. देवघरात मूर्ती ठेवली.आणि रोज नियमाने तो श्रीकृष्णाची पूजा करायचा.  खूप दिवस झाले, महिने झाले, वर्ष गेले पण त्याला काहीच फरक वाटला नाही. एवढे वर्ष झाली मी पूजा करतोय. तरी पण म...