परिवार आपला कि आपल्या धनाचा. आपल्या जीवनातील कटू सत्य
परिवार आपला कि आपल्या धनाचा...
मित्रांनो, आपण ज्यांना आपलं समजतो, ते खरोखर आपले आहे का..? याचा आपण कधी विचार केला का..? या जगात आपलं कोण आणि परकं कोण, हे कधी कळतं..? जेव्हा आपल्यावर एखाद संकट येत तेव्हा. संकटात साथ देणारेच आपले असतात हे खरं. पण मित्रांनो जेव्हा एखाद्यावर मृत्यूचं संकट येत. तेव्हा त्याच्यासोबत कोण असत..? याचा विचार आपण कधी करतच नाही.
जेव्हा एखाद्या व्यक्तीची मृत्यू होते. तेव्हा त्याच्यासोबतच त्याच्या सर्व वस्तू घराबाहेर काढल्या जातात. ज्या कपड्यावर तो झोपायचा, जे कपडे तो घालायचा, त्याने ज्या वस्तू वापरल्या, त्या सर्व वस्तू त्याच्या बॉडी बरोबरच बाहेर काढतात. पण एका गोष्टीच निरीक्षण केल, कि मग आपल्या लक्षात येईल कि, त्याने कमावलेला पैसा, धनदौलत, मात्र घरातच असते. ते बाहेर अजून तरी कोणी काढलं नाही. उलट त्याच्या गळ्यातील चैन, बोटात असलेली अंगठी, खिशात असलेले पैसे काढून घेतात.
याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते कि, आजपर्यंत जे आपल्याला आपलं समजत होते. खरंतर ते आपल्या पैशांमुळे आपल्याला जवळ करत होते. म्हणून तर माणसाची बॉडी बाहेर काढली जाते. पण त्याने कमावलेलं धन मात्र तसच ठेवलं जातं.
पण मित्रांनो आपण कमावलेल पुण्य, आपण केलेलं सत्कर्म. तुमच्याकडून कोणीच काढून घेऊ शकत नाही. आणि तेच शेवटी आपल्याला उपयोगी पडतं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा