पु. ल. देशपांडे यांचे मजेदार किस्से
पु. ल. देशपांडे यांनी आपल्या भाषणातुन, व्याख्यानातून नेहमी श्रोत्यांना हसायला भाग पाडलं, त्यांचं संपूर्ण जीवनचं मजेदार किस्स्यांनी भरलेलं होत किंबहुना आजही त्यांच्या आयुष्यातील किस्से वाचत असताना किंवा ऐकत असताना मन अगदी प्रसंन्न होत आणि चेहऱ्यावर हसू उमटतं..असेच काही मजेदार किस्से याठिकाणी आपल्याला वाचायला मिळणार आहे, चला तर मग थोडं हसुया... !!
1) त्याच्या एका मित्राच्या मुलीच लग्न ठरलं. आणि योगायोगाने माहेरचं आणि सासरचं आडनाव सारखंच होत. जेव्हा पु. ल यांना ही गोष्ट कळाली, तेव्हा पु. ल. म्हणाले "बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचं नाव राखलं"
2) एकदा माहेर चा जुना अंक वाचताना. भारती आचरेकरांची मुलाखत वाचली. त्यात त्या म्हणतात. त्यांची आई, माणिक वर्मा यांचे लग्न ठरल्याची बातमी कळल्यावर. पु. ल पटकन म्हणाले, "हिने तर वर्मावरच घाव घातला".
3) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनीसांच्या घरी गेले. त्तेव्हा तेथे पु. ल. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली, "हा माझा मित्र शरद तळवलकर". तेव्हा पु. ल. म्हणाले "हो का, अरे वा, चांगला मनुष्य दिसतोय. नाही, हा चांगलाच असणार... वसंतरावांनी विचारलं "कशावरून", तेव्हा पु. ल. म्हणाले "अरे याच्या नावावरूनच कळतं.. !" याच्या नावात एकही काना मात्रा वेलांटी उकार नाही. एकदम सरळ.. म्हणजे हा पण सरळच असणार... !
4) पु. ल. यांच्या "उरलंसुरलं"पुस्तकातील एक संवाद... "मित्रा कर्कोटका, मी आता तुला, फोनवर भडकाऊ बोलणाऱ्याचा आवाज एका दमात खाली कसा आणायचा, याच गुह्य सांगतो. "त्याने तिकडून आवाज चढवला कि आपण फक्त एवढंच म्हणायचं, "प्लीज जरा मोठ्याने बोलता का? "लगेच समोरचा आऊट. त्याचा आवाज खाली येतो कि नाही बघ.. !!
5) एकदा वसंतराव देशपांडे पु. ल. ना म्हणाले "ही मुलगी (सुनीताबाई) म्हणजे एक रत्न आहे. " लगेच पु. ल. म्हणाले "म्हणूनच गळ्यात बांधून घेतलंय".
6) एकदा आपली आणि सुनीताबाईंची ओळख करून देताना पु. ल. म्हणाले. "मी देशपांडे आणि या उपदेशपांडे".
7) एकदा एका भोजन समारंभात पु. ल. च्या एका बाजूला श्री ना. ग. गोरे आणि एका बाजूला श्री भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु. ल. म्हणाले "आफतच आहे एका बाजूला नाग तर दुसऱ्या बाजूला भुजंग...!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा