ज्ञानेश्वरीतील ओव्या अर्थासहित

भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी|कृपा करी हरी तयावरी... !!

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गिता सांगितली. पण भगवद्गीता ही संस्कृत भाषेत असल्यामुळे सामान्य जनतेला तिचा काही उपयोग होतच नव्हता. आणि ज्यांना संस्कृताचं ज्ञान होत. त्यांनी, गीतेमध्ये भगवंताने काय सांगितलं. हे समाजाला कळूच दिल नाही. अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण विश्वाला उद्देशून सांगितलेली गिता काही लोकांकरिताच मर्यादित राहिली.


 गीतेमध्ये सांगितलेलं ज्ञान सामान्य जनतेलाही कळावं आणि त्यांनी सुद्धा आपला उद्धार करून घ्यावा. म्हणून तोच श्रीकृष्ण परमात्मा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि अवघड असलेली गिता आपल्याला कळेल आशा भाषेत. म्हणजेच आपल्या मराठी भाषेत आपल्याला सांगितली. त्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील एक तरी ओवी आपण अनुभवावी. आणि आपला उद्धार करून घ्यावा. 

याठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वरीतील ओव्या वाचायला मिळणार आहे. आणि तेही अर्थ सहित चला तर मग आपणही या ज्ञानरूपी सागरात डुबकी मारू आणि आपल जीवन ज्ञानमय करून घेऊ... !!

ओम नमोजी आद्या|वेद प्रतिपाद्या|जय जय स्वसंवेद्या|आत्मरुपा||1||

अनादिसिद्ध वेदांनी वर्णन केलेल्या. ज्याच्या त्याच्या स्वतः प्रत्ययास येणाऱ्या. विश्वस्वरूप, निर्गुण आत्मरूपा. तुझा जयजयकार करून. तुला नमस्कार करत आहे... !!

देवा तूंचि गणेशु|सकलार्थमतिप्रकाशु|म्हणे निवृत्तिदासु|अवधारी जो जी||2||

हे देवा.. विश्वाच्या बुद्धीला प्रकाश देणारा गणेश. तो तूच आहेस. निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात. तो गणेश कसा आहे. अवधान पूर्वक ऐका... !!

हे शब्दब्रम्ह अशेष|तेचि मूर्ती सुवेष|तेथ वर्णवपु निर्दोष|मिरवत असे||3||

संपूर्ण वेद हीच जणू काही पोशाख केलेली गणेशाची मूर्ती आहे. आणि तिच्या ठिकाणी निर्दोष सौंदर्य शोभून दिसत आहे.. !!

स्मृती तेचि अवयव|देखा आंगिकभाव|तेथ लावण्याची ठेव|अर्थशोभा||4||

मन्वादिकांच्या स्मृती हे त्याचे अवयव आहे. ते अवयव या स्मृतीतील अर्थ सौंदर्याने जणू लावण्याची खाणच बनले आहे.. !!

अष्टादश पुराणे|तिची मणिभूषणे|पदपद्धती खेवणे|प्रमेयरत्नांची||5||

अठरा पुराणे हे गणेशाच्या अंगातील रत्नखचित अलंकार आहेत. यामध्ये सांगितलेली ही रत्ने, आणि शब्दांची छंदयुक्त रचना ही त्याची कोंदणे आहेत... !!

याठिकाणी येऊन आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.आपल मत नक्की नोंदवा.आणि रोज नवनवीन लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला follow करा. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनात घर करणारी, मनातून निघालेली भावना.Marathi Shayari

बाल कलाकार माऊली.आणि त्याच मन मोहून टाकणार हार्मोनियम वादन

Rakesh Jhunjhunwala Story:5000 te16000 करोड चा प्रवास.(warren Buffett of india)