Rakesh Jhunjhunwala Story:5000 te16000 करोड चा प्रवास.(warren Buffett of india)

आज आपण एका अशा व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी भारतीय shear market मधे आपली अशी छाप पाडली कि, आज त्यांना भारतीय shear market चा राजा मानलं जातं आहे. मित्रांनो, त्यांचं नाव आहे "rakesh jhunjhunwala" (राकेश झुनझुनवाला). 



Shear market म्हणजे काय..? 

Shear market च ज्ञान नसणारे याला जुगार म्हणतात. पण shear market जुगार नसून, तो एक व्यवसाय आहे. Shear म्हणजे "हिस्सा" जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे shear विकत घेता. तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे हिस्सेदार बनता. समजा एखाद्या कंपनीचे एक लाख shear विकायला आहे. आणि तुम्ही त्यातून दहा हजार shear घेतले. म्हणजेच तुम्ही त्या कंपनीत 10%हिस्सेदार झालात. 

मित्रांनो, "rakesh jhunjhunwala" यांनी shear market मधे 5000 रुपयांपासून सुरुवात केली होती. आज त्यांच्याकडे 16000 हजार करोड रुपये आहेत. आणि आज परिस्थिती अशी आहे कि, ते एकटेच shear market मधे उलथापालथ करू शकतात. कारणं भरपूर investor त्यांच्याच मार्गावर पाय ठेऊन चालतात. भारतीय श्रीमंतांच्या यादीत त्यांचं नाव 53 नंबरला आहे. 

सुरुवात.. 

"Rakesh jhunjhunwala" यांचा जन्म 5 जुलै 1960, मुंबईतील एका मारवाडी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील "income tax officer" होते आणि त्यांची shear market मधे पण आवड होती. घरी आलेल्या मित्रांसोबत ते नेहमी shear market विषयी चर्चा करायचे. एक दिवस 14 वर्षाच्या राकेशने वडिलांना विचारलं कि, पप्पा हे shear market म्हणजे काय हो.? तेव्हा त्यांच्या वडिलांनी सांगितलं कि बेटा, shear market कळणं एवढं सोपं नाही. त्यासाठी रोज पेपर वाचायला पाहिजे. पेपरात रोज वेगवेगळ्या कंपन्यांची माहिती येत असते. Shear market मधे पैसे invest करण्याआधी आपल्याला कंपन्यांची होणारी चढ उतार माहित असायला हवी. Shear market विषयी rakesh jhunjhunwala यांना वडिलांकडून मिळालेली ही पहिली शिकवण होती. 


आता त्यांनाही shear market ची आवड वाटायला लागली होती. वडिलांनी सांगितल्या प्रमाणे ते रोज पेपर वाचायचे आणि shear market विषयी माहिती मिळवायचे. जेव्हा त्यांना शेअर मार्केट विषयी चांगल कळायला लागलं. तेव्हा त्यांनी वडिलांना shear market मधे येण्याची ईच्छा बोलून दाखवली. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना साफ नकार दिला आणि अगोदर तुझं शिक्षण पूर्ण कर, मग तुला पाहिजे ते कर म्हणून सांगितलं. 

वडिलांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी शिक्षण पूर्ण केल. आता वेळ होती मार्केटमध्ये उतरायची. पण त्यासाठी त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते. त्यांनी shear market मधे पहिली investment 5000 रुपयांची केली होती. आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर त्यांनी चांगलाच नफा मिळवला. त्यांच्या आयुष्याचा turning point होता 2002-2003, त्यांनी titan कपंनीचे 6 करोड shears 3 रुपये प्रति shears किमतीने घेतले. नंतर त्याच shears ची किंमत 390 रुपये झाली.आणि rakesh jhunjhunwala यांना तेव्हा 2100 करोड रुपयांचा फायदा झाला. 


असं नाही कि त्यांना नेहमी फायदाच झाला. त्यांना सुद्धा नुकसान सहन कराव लागलं. पण त्यांनी आपल्या हुशारीने झालेलं नुकसान भरून काढलं. आणि आज rakesh jhunjhunwala हे 16000 करोड चे मालक आहेत. Rakesh jhunjhunwala यांचा एकच मंत्र आहे. "Buy right and hold tight" बरोबर shear घ्या आणि संयम बाळगा. 

कारणं तुम्ही जर shear market मधे उतावीळपणा दाखवला,तर तुमचं नुकसान होणार हे ठरलेलं आहे. 

Rakesh jhunjhunwala यांचं जीवन आपल्यासाठी एक प्रेरणा आहे, खासकरून त्यांच्यासाठी, ज्यांना वाटत आपल्याकडे पैसा नाही तर आपण काहीच करू शकत नाही. 

हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि नवनवीन लेख वाचण्यासाठी Marathi Sahitya या ब्लॉगला followe करा. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनात घर करणारी, मनातून निघालेली भावना.Marathi Shayari

बाल कलाकार माऊली.आणि त्याच मन मोहून टाकणार हार्मोनियम वादन