मनात घर करणारी, मनातून निघालेली भावना.Marathi Shayari
आपल्या आयुष्यात नेहमी असे प्रसंग येतात. कि ज्यामुळे आपल्याला सुखदुःखाची जाणीव होते. आणि यातूनच आपल्या मनामध्ये एखादी कविता, एखादी शायरी, एखाद गीत निर्माण होत. खरंतर तो प्रत्येकाचा अनुभव असतो. एखाद्याला थोडी वेदना झाली कि तो त्यावर काहितरी सहज बोलतो किंवा लिहितो. आणि त्यालाच आपण कविता, गीत, किंवा शायरी म्हणतो. असेच काही मनातून निघालेले, मनाला भुरळ पडणारे विचार.
वेदना..
पाळता येत नाही आणि टाळता येत नाही...
काही केल्या सांभाळता येत नाही...
फेकता येत नाही किंवा विकता येत नाही...
तिच्यासोबत जगूनही जगता मात्र येत नाही... !!
भावना..
नकळत हाती घेतलेला हात, अगदी असाच असावा, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...
किमान एवढी एकतरी भावना, माझ्या मनाची, पोहचावी तुझ्यापर्यंत...
काळजी..
काळजी करू नको, असं सांगणार कुणी असलं म्हणजे, माणूस जास्त काळजी करायला लागतो.
मान-अपमान..
परक्यांनी दिलेला "मान", आणि
आपल्यानी केलेला "अपमान "
माणूस कधीच विसरत नाही...
सुंदर....👌👌👌
उत्तर द्याहटवा