चला थोडं हसुया. Marathi comedy
असं म्हणतात कि माणसाने नेहमी आनंदी राहावं. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधावा. कारणं हसल्याने आयुष वाढतं. एवढ्या सोप्या पद्धतीने जर आयुष्य वाढत असेल तर आपण सुद्धा नेहमी आनंदी राहूया. हसुया आणि हसवुया.
जिंदगी गम का सागर भी हैं,
"हसके "उस पार जाणा पडेगा.
जीवनात दुःख चालूच राहणार. पण आलेल्या दुःखाला हसत सामोरं जायचं आणि आनंदी राहायचं.
तुम्हाला हसवण्यासाठी याठिकाणी मी काही विनोद शेअर करणार आहे. आणि तुम्हाला हसायलाच लावणार आहे. तुम्ही सुद्धा याचा आनंद घ्या. आणि आपल्या मित्रांनाही हसवा.
सासू : तुला स्वयंपाक करता येत नाही ?
सुनबाई : नाही .
सासू : मग तु हे लग्नाआधी का नाही सांगितलं ?
सुनबाई : तुम्हाला सरप्राईज द्यायचं होत म्हणून.. !
पेशंट : कोरोनाची लस दंडालाच का देतात ?
डॉक्टर : कारणं दुसरीकडं दिली तर तुम्हाला फोटो काढून स्टेटसला ठेवता येणार नाही.
दोन बाया बसमध्ये जागेसाठी भांडत होत्या. त्यांचं भांडण ऐकून कंडक्टर म्हणाला, "तुमच्या दोघीत जी म्हातारी असेल तर बसेल". बिचाऱ्या शेवटपर्यंत उभ्या राहू गेल्या.
पण सोडणार नाही मधाचं पोळ.
काल एकाने दहा चे फुटाणे खाऊन, 199 च्या fogg ची वाट लावली.
☺️😂
उत्तर द्याहटवा😂😂😂😅
उत्तर द्याहटवा