गुरुवर्य कुरेकर बाबांनी दिला कोरोना लस संपूर्ण सुरक्षित असल्याचा दाखला. Corona vaccine
साधकांचे मायबाप असणारे, शांतिब्रम्ह मारोती महाराज कुरेकर बाबांनी कोरोना लस (corona vaccine)घेऊन, लस सुरक्षित असून, सर्वांनी लस घ्यावी असा संदेश दिला.
संपूर्ण जगाला त्रासदायक ठरलेल्या corona ची लस निर्माण झाली आणि कुठेतरी एक आशेच किरण आपल्याला दिसायला लागल. पण एखाद्या गोष्टीला विरोध नाही झाला, असं इतिहासात बघायला मिळत नाही. अगदी corona ची लस निर्माण झाली आणि तिला सुद्धा बराच विरोध झाला. आता तो विरोध का झाला, याची कारणं वेगवेगळी. पण याचा परिणाम असा झाला. कि सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला. लस घ्यावी का नाही.
एकीकडे corona मुळे मारणाऱ्या माणसांची संख्या वाढतच आहे आणि एकीकडे लस घ्यावी कि नाही घावी हा संभ्रम मनात आहे.
समाजातील तज्ज्ञ लोकांनी जनतेला लसीचे महत्व पटवून दिले. लस घ्या म्हणून आवाहन केल, विनंती केली. आम्ही लस घेतली तुम्ही पण घ्या. लस पूर्ण सुरक्षित आहे असं वारंवार सांगण्यात आलं.
आता अशातच, corona लस संपूर्ण सुरक्षित असल्याचा अजून एक दाखला मिळाला. तो म्हणजे, वारकरी संप्रदायातील सर्व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान, साधकांचे मायबाप, शांतिब्रम्ह, गुरुवर्य, मारोती महाराज कुरेकर बाबा.
90 वर्ष वय असलेले कुरेकर बाबा सध्या त्र्यंबकेश्वर येथे आहे.आणि त्यांनी corona ची लस घेऊन जनतेला सुद्धा corona ची लस घेण्याचा संदेश दिला.
आदरणीय बाबा म्हणाले कि "लस पूर्ण सुरक्षित आहे, जे ही लस घेण्यासाठी पात्र आहेत. त्यांनी अवश्य लस घेतली पाहिजे"
बाबांच्या या संदेशामुळे corona लसी बाबत असलेला संभ्रम कमी होण्यासाठी खूप मदत होईल यात शंका नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा