फेसबुक वापरणाऱ्यांनो सावधान तुमच्या सोबत होऊ शकतो हा धोका.facebook
फेसबुक वापरणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा..
Facebook चा वापर अनेकजण चांगल्या कामासाठी करतात. Facebook मुळे अनेकांना एक व्यासपीठ दिल. Facebook ने अनेकांना समाजात चांगली ओळख दिली.
पण आता facebook वापरणाऱ्यांसाठी धोक्याची बातमी आहे. हॅकर्सद्वारे सर्व facebook account क्लोनिंग केले जातं आहे. तुमच नाव, तुमचा फोटो आणि तुमच्या अकाउंट वरील माहितीचा वापर, तुमच्या अकाउंट सारखंच दुसरं अकाउंट बनवण्यासाठी केला जातं आहे.अकाउंट बनवल्या नंतर त्यामध्ये आपल्या मित्रांना ऍड केल जातं आहे. आपल नाव आणि आपला फोटो पाहून, आपले मित्र त्या अकाउंटची रिकवेस्ट एकसेप्ट करतात.
आपल्या नावाचा, आपल्या अकाउंटचा गैरवापर केला जाऊ शकतो. आपल्या नावाखाली, हॅकर्स फेसबुकवर काहीही लिहू शकतात. अश्लील, जातीवाद निर्माण होईल अशी पोस्ट, धार्मिक पोस्ट केली जाऊ शकते. यामुळे आपल्याला कायदेशीर कारवाईला तोंड देण्याची वेळ येऊ शकते. म्हणून आपल्या अकाउंटचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी घ्या.
खबरदारी म्हणून आपण आपल्या मित्रांना सूचित केल पाहिजे. जेणेकरून ते सुद्धा सावध राहतील. म्हणून प्रत्येकाने आपल्या facebook वरील मित्रांना एक कल्पना आधीच देऊन, पुढ होणारा धोका टाळावा. (खाली लिहिलेला छोटा मॅसेज आपण आपल्या मित्रांना सेंड करू शकतो. )
👍👍👍
उत्तर द्याहटवा