आपल्यालाही होईल श्रीकृष्णाची भेट. एक सत्य घटना
प्रिय वाचकांनो. जगामध्ये भक्ती करणारे खूप आहेत. प्रत्येकजण आपापल्या आराध्याची भक्ती करतो. प्रत्येकाचं आराध्य दैवत वेगळं, प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धतही वेगळी.भक्ती मात्र प्रत्येकजन करतो. मग आपण एवढी भक्ती करतो. रोज देवाची पूजा करतो. साऱ्या देवांची पूजा करतो. तरी पण अजून आपल्याला देवाची भेट का होत नाही. हा प्रश्न आपल्या मनात येणं साहजिकच आहे.
या प्रश्नाच उत्तर आपल्याला नक्कीच, हा लेख वाचल्यावर कळणार. एका व्यक्तीच्या जीवनातील ही घटना. आपल्याला शिकवते कि, भक्ती कशी असावी. कशाप्रकारे भक्ती केली म्हणजे ती देवापर्यंत पोहचेल.
एक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये खूप दुःखी असायची. एक दिवस त्याचा मित्र त्याला भेटला आणि त्याला सांगितलं कि, तुझ्या जीवनामध्ये असलेलं दुःख जावं असं जर तुला वाटत असेल, तर तु श्रीकृष्णाची पूजा कर. नक्कीच तुला श्रीकृष्ण भेट देतील.
त्या व्यक्तीने श्रीकृष्णाची एक मूर्ती विकत आणली. देवघरात मूर्ती ठेवली.आणि रोज नियमाने तो श्रीकृष्णाची पूजा करायचा.
खूप दिवस झाले, महिने झाले, वर्ष गेले पण त्याला काहीच फरक वाटला नाही. एवढे वर्ष झाली मी पूजा करतोय. तरी पण मला देव भेटत नाही. या विचाराने तो खूप दुःखी झाला.
असच एक दिवस त्याला दुसरा मित्र भेटला. आणि त्याने सांगितलं कि, तु देवीची पूजा कर. तुझ्या जीवनातील दुःख नक्की जातील. त्याने बाजारातून देवीची मूर्ती विकत आणली. आणि कृष्णाची मूर्ती काढून, देवीची मूर्ती देवघरात ठेवली. देवघराच्या वर असलेल्या एका फळीवर त्याने कृष्णाची मूर्ती ठेवली. आणि आता तो रोज देवीची पूजा करायला लागला.
असच काही दिवस झाले. आणि एक दिवस त्याच्या मनात विचार आला कि, आपण लावत असलेल्या अगरबत्ती आणि धूपबत्तीचा सुगंध कृष्ण घेतो. तो सुगंध कृष्णाने घेऊ नये म्हणून मी त्याच तोंडच बांधून टाकतो. म्हणून तो कृष्णाच्या मूर्तीचा तोंड बांधण्यासाठी वर चढला आणि रुमालाने मूर्तीच तोंड बांधायला लागला.
तेवढ्यात अचानक त्याला जाणवलं कि, आपला हात कृष्णाने धरलाय. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने कृष्णाला विचारलं कि, एवढे दिवस मी तुझी पूजा केली, तेव्हा नाही आला. आणि आता तर मी तुझी पूजाही करत नाही. मग आता तु असा अचानक का आला.
त्यावर श्रीकृष्ण त्याला सांगतात कि, अरे तु माझी पूजा फक्त एक मूर्ती समजून करायचा. आज पहिल्यांदा तुला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली.तु लावत असलेल्या अगरबत्तीचा सुगंध मी घेतोय हे तुला जाणवलं म्हणून मी आलो.
फारच छान.. मनाला भुरळ घालणारा लेख आहे....
उत्तर द्याहटवा