प्रेम म्हणजे काय.? प्रेमाची खरी व्याख्या करणारा लेख.real love
तुम्ही केलंय का कुणावर प्रेम...?
जगामध्ये अशी एकही व्यक्ती नसेल, ज्याचं/जिचं कोणावर प्रेमच नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक पुरुषाच आणि प्रत्येक स्त्रीच कुणावर तरी प्रेम असतंच.त्या प्रेमाची व्याख्या प्रत्येकजण आपल्या मनाप्रमाणे करतो.
सध्याच्या काळात तर प्रेमाची भाषाच बदलून टाकली आपण (मी नाही). प्रेम फक्त एका मुलाने एका मुलीवर करायचं. सोबत फिरायचं. सोबत राहायचं. शरीराचा उपभोग घ्यायचा. बस.. झालं प्रेम.
प्रेमाची खरी व्याख्या करायची झाली, तर प्रेम म्हणजे दोन आत्म्यांच मिलन. कोण कधी कोणाला आवडेल. आपल्या हृदयात कोण कोणाला जागा देईल. याविषयी कोणीच काही बोलू शकत नाही. कारणं प्रेम सहज होत असत.ठरवून जे केल जातं ते प्रेम नसतं, तर प्रेमाच्या नावाखाली केलेला तो एक व्यवहार असतो.
प्रेम एखाद्याचा चेहरा पाहून नाही केल जातं. प्रेमामध्ये सत्यता असायला हवी. विश्वास असायला हवा. प्रेमात हे महत्वाचं नाही, कि ज्याला आपण पसंद करतो. त्याने सुद्धा आपल्याला पसंद करावं. अरे प्रेम तर कुणावरही होऊ शकत. प्रेम आई वडिलांवर होऊ शकत. प्रेम भावा बहिणीवर होऊ शकत. प्रेम नातेवाईकांवर होऊ शकत. प्रेम मित्रांवर होऊ शकत. अहो इतकंच कशाला. प्रेम पशु पक्षांवर सुद्धा होऊ शकत.
प्रेम तर मनात कोणताही स्वार्थ न ठेवता केल जातं. आपण एखाद्यावर प्रेम करतोय, तर त्याने पण आपल्यावर प्रेम केल पाहिजे, अशी अपेक्षा मनात ठेऊ नये. फक्त तुम्ही त्याच्यावर प्रेम करत रहा. आणि त्याला खूष ठेवा. मग भलेही ती व्यक्ती आपल्यावर प्रेम न करता दुसऱ्या कुणावर प्रेम करत असेल.
हे महत्वाचं नाही, कि आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय,तीच व्यक्ती आपली जीवनसाथी झाली पाहिजे.हा तर स्वार्थ झाला, प्रेम तर निस्वार्थी असाव.
प्रेम प्रभू का रुप हैं, प्रेम मुक्ती का द्वार प्रेम कि बढती करले, वरना जिंदगी बेकार
थोडक्यात सांगायचं झालं तर, प्रेम म्हणजे काय.? आई मुलावर करते ते प्रेम, गाय वासरावर करते ते प्रेम, मासा पाण्यावर करतो ते प्रेम, देव भक्तावर आणि भक्त देवावर करतो ते प्रेम,
मला आशा आहे कि हा लेख तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला माझा हा लेख कसा वाटला कमेंट करून सांगा. प्रेम काय असत हे इतरांनाही कळावं म्हणून शेअर करा आणि Marathi Sahitya या ब्लॉगला followe करा.
👌👌👌👌
उत्तर द्याहटवा👍👌👌
उत्तर द्याहटवा