बाल कलाकार माऊली.आणि त्याच मन मोहून टाकणार हार्मोनियम वादन

देवाने माणसाला दिलेलं एक वरदान म्हणजे संगीत. सुख असो किंवा दुःख. दोन्ही काळात आपल्याला जर कोण साथ देत असेल.? तर ते आहे संगीत. "कला असे मानवासी भूषण" माणसाकडे एखादी तरी कला असावी. एखादा तरी गुण असावा. हल्ली आपल्याला गुण नाही पण अवगुण असलेले पाहिजे तेवढे भेटतील. 


संगीत आपल्याला जगायला शिकवतं. संगीत आपल्याला माणसात देव शोधायला शिकवतं. संगीत माणसाला माणसाशी जोडत. संगीतामध्ये एवढी ताकत आहे, कि मोठमोठे आजार सुद्धा संगीत ऐकल्यामुळे दूर झाले. 

एखादी कला अवगत करायची असेल, तर त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. काहींना अगदी थोड्या कालावधीत संगीत साध्य होत. तर काहींना वर्षानुवर्षे मेहनत घेऊनही ते साध्य करता येत नाही. 

आळंदी या तीर्थक्षेत्री, महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरून दरवर्षी हजारो विद्यार्थी, अध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी येतात. प्रत्येकाची आवड वेगळी. कुणाला पखवाज शिकायचा असतो, कुणाला गायन, तर कुणाला कीर्तनकार व्हायचं असत. पण आळंदीला येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात जास्त संख्या पखवाज शिकणाऱ्यांची. 


आळंदीला आल्यावर, पखवाज शिकण्यासाठी क्लास कोणाकडे लावायचा? हा एक किचकट विषय. कारणं कुठलंही शिक्षण घ्यायचं असेल, तर त्यासाठी पैसे लागतात. आळंदीत सुद्धा ही एक समस्या. कारणं आळंदीला आलेले सर्वच विद्यार्थी, क्लास साठी लागणारी फी देऊ शकत नाही. अशा गरजू विद्यार्थ्यांना, आळंदीमध्ये गेली अनेक वर्ष, एक रुपयाही न घेता पखवाज शिकवणारे, आळंदी मधील प्रत्येक विद्यार्थ्यांचे लाडके गुरुजी, आदरणीय, गुरुवर्य रमेशजी महाराज गोरे (गुरुजी)


आळंदीमध्ये "श्रीनाथ संगीत शिक्षण संस्था" स्थापन करून, विद्यार्थ्यांना मोफत पखवाजाचं शिक्षण देऊन  आदरणीय गुरुजींनी,आळंदीमध्ये एक आदर्श घालून दिला.आणि त्याच सत्कर्माचं फळ माउलींनी गुरुजींना दिल, आपल्या लाडक्या माऊलीच्या रूपाने. 


एवढ्या कमी वयामध्ये माऊली ज्या पद्धतीने हार्मोनियम वाजवतो, गातो, नोटेशन गातो, पखवाज वाजवतो. नक्कीच आज माऊली त्या सर्व मुलांसाठी एक आदर्श आहे. जे मुलं मोबाईल बघण्यात आपला वेळ वाया घालवतात. 


सर्वगुण संपन्न असणारा माऊली, भविष्यातील उगवता तारा आहे. माउलीला हार्मोनियम वाजवताना पाहिलं कि डोळे आणि कान तृप्त झाल्याशिवाय राहात नाही. 



आमच्या वयामध्ये जरी अंतर असलं, तरी खूप दिवस सोबत राहिल्याने आमची मन मात्र सारखीच. 

माउलीचे विडिओ पाहण्यासाठी युट्युबवर जाऊन "रमेश महाराज गोरे" या चॅनेल ला सबस्क्राइब करा. खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा आणि माऊलीच्या हार्मोनियम वादनाचा आनंद घ्या.

https://youtu.be/9gdA25TNnS8 

हा लेख कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि नवनवीन लेख वाचण्यासाठी Marathi Sahitya या ब्लॉगला followe करा. आणि हा ब्लॉग शेअर करा. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनात घर करणारी, मनातून निघालेली भावना.Marathi Shayari

Rakesh Jhunjhunwala Story:5000 te16000 करोड चा प्रवास.(warren Buffett of india)