श्री विठ्ठलाचा पाळणा
श्रीविठ्ठलाचा पाळणा पहिल्या दिवशी आनंद झाला | टाळ मृदंगाचा गजर केला || चंदन बुक्क्याचा सुवास त्याला | पंढरपुरात रहिवास केला |जो | दुसऱ्या दिवशी करुनि आरती | दिंड्या पताका वैष्णव नाचती || वरती बैसविला लक्ष्मीचा पती || जो. || तिसऱ्या दिवशी दत्ताची छाया | सुंदर किती हो बाळाची काया || आरती ओवाळू जय प्रभुराया || जो. || चवथ्या दिवशी चंद्राची छाया | पृथ्वी रक्षण तव कराया || चंद्रसूर्याची बाळावर माया || जो. || पाचव्या दिवशी पाचवा रंग | लावुनी मृदंग आणि सारंग || संत तुकाराम गाती अभंग || जो. || सहाव्या दिवशी सहावा विलास | बिलवर हंड्या महाली वास || संत नाचती गल्लोगल्लीत || जो. || सातव्या दिवशी सात बहिणी | एकमेकींचा हात धरोनि || विनंती करिती हात जोडोनि || जो. || आठव्या दिवशी आठवा रंग | गोप गौळणी झाल्या त्या दंग || वाजवी मुरली उडवितो रंग || जो. || नवव्या दिवशी घंटा वाजला | नवखंडातील लोकं भेटीला || युगे अठ्ठावीस उभा राहिला || जो. || दहाव्या दिवशी दहावीचा थाट | रंगीत फरश्या टाकिल्या दाट || महाद्वारातून काढली वाट || जो. || अकराव्या दिवशी आकार केला | सोन्याचा कळस शोभे शिखराला || रुख्मिणी बैसली डाव...