नेल्सन मंडेला यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग.nelson mandela

प्रिय वाचकांनो.. आपण याठिकाणी, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती, नेल्सन मंडेला यांच्या जीवनात घडलेला एक प्रेरणादायी प्रसंग पाहणार आहोत. ज्यामुळे कदाचित आपल्यालाही थोडी शिकवण मिळेल. आणि आपण समाजामध्ये कस वागावं हे कळेल. 

नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती झाल्यावर, एकदा आपल्या आंतरिक अंगरक्षकांसोबत शहरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. प्रत्येकाने आपल्याला जे आवडत ते ऑर्डर केल आणि जेवण येण्याची वाट पाहू लागले. त्याचवेळी नेल्सन मंडेला यांच्या खुर्ची समोर एक व्यक्ती बसलेला होता. तो पण त्याने मागवलेलं जेवण येण्याची वाट बघत होता. नेल्सन मंडेला आपल्या एका अंगरक्षकाला सांगतात कि त्या समोर बसलेल्या व्यक्तीला घेऊन ये आणि आपल्या सोबत जेवण करायला सांग. 

अंगरक्षकाने त्या माणसाला बोलावलं, आणि आमच्या सोबत जेवण करायला बस म्हणून सांगितलं. तो माणूस खाली मन घालून, काहीही न बोलता जेवण करत होता. त्याचे हातपाय थरथर करत होते. जेवण झालं आणि तो माणूस शांतपणे, एकही शब्द न बोलता निघून गेला. अंगरक्षक मंडेलांना म्हणाला, त्या व्यक्तीचे हातपाय थरथर करत होते, म्हणजे ती व्यक्ती आजारी असली पाहिजे. मंडेला म्हणाले, "तस नाही, मला ज्या तुरुंगात ठेवलं होत, त्या तुरुंगाचा तो सुरक्षारक्षक होता". त्या ठिकाणी मला खूप त्रास दिला जात होता. मला खूप वेदना व्हायच्या. मी त्यामुळे विव्हळायचो .मला तहान लागल्यावर मी पिण्यासाठी पाणी मागायचो, तर हा माझ्या अंगावर स्वतःच मूत्र टाकायचा. 

पण आता वेळ बदलली, मी राष्ट्रपती झालो. त्याला वाटलं कि आपण याला खूप त्रास दिलेला आहे, त्यामुळे आता हा पण आपल्या सोबत तसाच वागणार. "हे माझं चरित्र नाही. कारणं मला असं वाटत कि, सूड घेण्याच्या भावनेने
केलेलं काम नेहमी विनाशाकडे घेऊन जातं. याउलट, धैर्य आणि सहिष्णुतेची भावना आपल्याला नेहमी विकासाकडे घेऊन जाते. म्हणून मी त्याच्यासोबत त्याच्या सारखं नाही वागलो. मी जर बदला घेण्याच्या भावनेला त्याला त्रास दिला असता. तर त्याच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला असता. 

तुम्ही किती पैसा कमावला, तुम्ही कोणत्या पदावर आहात,यावरून तुमची श्रीमंती नाही कळतं. 
तुमचे विचार, तुमची सहिष्णुतेची भावना, समाजासाठी असणारी तळमळ तुम्हाला मोठं करते. हीच तुमची खरी श्रीमंती. 
मोठा कोणाला म्हणायचं..? 
जो फक्त मोठ्यांच्या सोबत राहतो तो मोठा नाही, जो लहानांना आपल्या सोबत घेऊन चालतो, लहानांना मोठं करण्याचा प्रयत्न करतो, तो खरा मोठा माणूस. 

नेल्सन मंडेला यांच्या जीवनात घडलेला हा प्रसंग नक्कीच आपल्याला खूप काही शिकवून जातो. 
तुम्हाला हा लेख कसा वाटला कमेंट करुं सांगा. आणि नवनवीन लेख वाचण्यासाठी Marathi Sahitya या ब्लॉगला followe करा, धन्यवाद. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनात घर करणारी, मनातून निघालेली भावना.Marathi Shayari

Rakesh Jhunjhunwala Story:5000 te16000 करोड चा प्रवास.(warren Buffett of india)

बाल कलाकार माऊली.आणि त्याच मन मोहून टाकणार हार्मोनियम वादन