पती पत्नी मधे वाद का होतात, लग्न कस टिकवायचं याचा थोडा विचार. Wife husband

मित्रांनो. सध्याचा काळ असा आहे कि उच्चशिक्षित तरुणांना सुद्धा लग्नासाठी मुली मिळत नाही. मग ज्यांचं शिक्षण नाही. ज्यांच्याकडे नोकरीं नाही. घरची परिस्थिती चांगली नाही त्यांचा तर विषयच नाही. म्हणून सध्या प्रत्येकाची समस्या कोणती असेल. तर ती आहे लग्न.. !लग्न झाल्यावरही नवरा बायकोमधे वाद होतो. त्या वादाची कारणं कोणती..? याचाच आपल्याला विचार करायचा आहे. चला तर मग पाहूया आणि समजून घेऊया ती कारणं कोणती...? 

1)बदलती मानसिकता 

समाजामध्ये अशी एक भावना निर्माण झालेली आहे कि "दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र रहा.स्वभाव वेगळे आहे.एकमेकांचे विचार पटत नाही तर लगेच वेगळे व्हा" अशी भावना रुजत चालली आहे. म्हणून नात्यांमध्ये अंतर निर्माण होत आहे. 

2)सामाजिक बदल 

आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. म्हणून मुलींच म्हणणं असं आहे कि आता मी सुद्धा सक्षम आहे. मी सुद्धा कमवते मग मी का सहन करायचं. यामुळेही वाद होतो. 


3)बदलती जीवनशैली 

सोशल मीडियाच्या जास्त वापरामुळं नात्यामध्ये दरी निर्माण झाली.एकमेकांबद्दल असलेल्या अपेक्षा बदलत चालल्या. प्रत्येकाला दोघांनाही स्वातंत्र्य पाहिजे. त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दोघेही दाखवत नाही. आणि याचा परिणाम म्हणूनच वाद होतो. 

4)संवाद कमी 

टीव्ही, मोबाईल, व्हाट्सअप, फेसबुकच्या सततच्या वापरामुळं दोघांचा संवाद कमी झाला. एकमेकांना वेळ देण्यासाठी दोघांना वेळच नाही राहिला आणि संवाद न झाल्यामुळे दोघांमध्ये नेहमी वादच होतो. 

5)पालकांचा हस्तक्षेप 

आपल्या मुलीला सासरी सुद्धा तिच्या मर्जीप्रमाणे सर्व काही मिळावं, म्हणून मुलीचे आईवडील तिच्या संसारात हस्तक्षेप करतात. आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्या पासून दूर जाऊ नये म्हणून मुलाचे आईवडील त्याच्या संसारात हस्तक्षेप करतात. 

6)अहंकार 

नवराबायको दोघही उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे, ऐकायचं कोणी, कमीपणा घ्यायचा कोणी, बदलायचं कोणी हा मोठा प्रश्न आहे. समोरच्याने बदलावं, मी बदलणार नाही. या अहंकारामुळे दोघांमध्ये वाद होतात. 

7)प्रत्येक गोष्टीत स्पर्धा 

दोघांनीही आपल्या मधेच होणारी स्पर्धा टाळावी. त्याने असं केल तर मग मी पण असं करणार, ही भावना नसावी. "तु माझ्या घरच्यांना, नातेवाईकांना नीट बोलत नाही. आता मी पण तुझ्या घरच्यांना, नातेवाईकांना नीट बोलणार नाही ही स्पर्धा नेहमी चालू असते. म्हणून वाद होतो. 

8)जबाबदारीची जाणीव 

लग्नानंतर आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक जबाबदारीची जाणीव असायला हवी. आणि प्रत्येक जबाबदारी व्यवस्थित पार पडण्याची तयारी ठेऊन दोघांनीही आपल्या भूमिका आणि आणि दृष्टिकोनामध्ये बदल करावा. 

9)मनमोकळा संवाद

दोघांनीही एकमेकांना दाद देने, प्रत्येक कामाचं कौतुक करणे, जी गोष्ट जमली नाही, पटली नाही तिच्या विषयी मोकळ्या मनाने बोलणे. एवढं जमलं कि मग वाद कमी होतात. 

10)इतर कारणे 

एकमेकांविषयी गैरसमज, संशय, व्यसन, दुसऱ्याला त्रासदायक असणाऱ्या सवयी, शारीरिक आणि मानसिक आजार असे अनेक कारणं आहेत ज्यामुळे नवराबायको नेहमी वादाला सामोरे जाता. एवढ्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न केला तर नक्कीच एक सुंदर नातं तयार होईल यात संशय नाही. 

आमचा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि नवनवीन लेख वाचण्यासाठी आमच्या Marathi Sahitya या ब्लॉग ला follow करा धन्यवाद. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनात घर करणारी, मनातून निघालेली भावना.Marathi Shayari

Rakesh Jhunjhunwala Story:5000 te16000 करोड चा प्रवास.(warren Buffett of india)

बाल कलाकार माऊली.आणि त्याच मन मोहून टाकणार हार्मोनियम वादन