बघता बघता आपल्या वृंदावन यात्रेला तीन वर्ष पूर्ण
श्रीधाम वृंदावन यात्रा
2000 भाविकांसोबत वृंदावनधाम यात्रेचा आनंद घेण्याचं भाग्य लाभलं यातच धन्यता.
गुरुवर्य श्री रमेशजी महाराज गोरे गुरुजी.. गुरुजींच्या आयोजन, नियोजन आणि प्रेमळ सहवासात या यात्रेच्या आनंदात सहभागी होऊन आम्ही स्वतःला धन्य समजतो.
यात्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक यात्रेकरूंच्या वतीने गुरुजींचे आभार व्यक्त करूया.
कधी वाटलं नव्हतं कि, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण वास्तव्य करून जगाला प्रेमाची शिकवण देऊन गेले आणि आजही प्रेमाच्या रूपाने वास्तव्य करतात. ज्या ठिकाणी राधारानी वास्तव्य करते. ज्या ठिकाणी माणूस तर सोडा, पण पशु पक्षीही प्रेमाची शिकवण देतात. मोठमोठे ऋषीमुनी जिथे भगवंताच्या प्रेमाची अनुभूती घेण्यासाठी धावून जातात. त्या ठिकाणी, म्हणजेच श्रीधाम वृंदावन या पावन क्षेत्रात आपणही जाऊ,आणि श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये आपणही वाटेकरी होऊ. पण आमचे सर्वांचे लाडके गुरुजी..
गुरुजींच्या मनामध्ये हा विचार आला, आणि गुरुजींनी त्या विचाराला सत्यामध्ये उतरवलं. त्याबद्दल गुरुजी, तुमचे हे ऋण आम्ही कधीच नाही फेडू शकत.
वृन्दावनला जाणारे कमी नाही. रोज हजारो माणसं जातात आणि येतात. पण आपण एकटे न जाता. आपल्या बरोबर इतरांनाही वृन्दावनाचं दर्शन घडवू, हा विचार त्यांच्याच मनात येईल, ज्यांच्या मनामध्ये श्रीकृष्ण वास्तव्य करतात. आणि हा विचार आमच्या गुरुजींच्या मनामध्ये आला. फक्त विचार करणारे पण खूप आहेत. पण मनामध्ये आलेला विचार सत्यामध्ये उतरवणारे क्वचितच.
गुरुजींनी आपला हा विचार परिवारातील सर्वांना बोलून दाखवला आणि परिवारातील सर्वांनी यासाठी मोकळ्या मनाने सहमती दर्शवली. (गुरुजींचा परिवार म्हणजे गुरुजींनी घडवलेले हजारो विद्यार्थी, आणि गुरुजींच्या आयुष्यातील स्नेहाची माणसं).
यात्रेला जायचं पक्क झालं. आणि अशातच गुरुजींनी सर्वांना एक अत्यानंदाची गोष्ट सांगितली. ती म्हणजेच "वृन्दावनला आपल्या सोबत आपले सर्वांचे लाडके, आदरणीय, पूजनीय, वंदनीय, ज्यांच्याकडे आपण साक्षात माऊली म्हणूनच पाहतो. शांतिब्रम्ह, गुरुवर्य मारोती बाबा कुरेकर, वृन्दावनला येणार".
बाबा येणार हे कळालं आणि आपल्या आनंदामध्ये अजूनच भर पडली कारणं, आपल्याला भगवंताच्या भूमीमध्ये जायचं आणि त्यात आपल्यासोबत आपले लाडके बाबा येणार ही गोष्टच खूप आनंद देणारी होती. कारणं भगवंताची भेट संतांशिवाय होत नाही हे अबाधित सत्य आहे. "संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही".
आणि अशातच बाबा येणार हे ऐकून आनंद नाही होणार का..?
यात्रेला अनेक नामांकित व्यक्तिमत्व आले. त्यामध्ये सर्वांचे लाडके, कीर्तनकेसरी, अक्रूर महाराज साखरे आदरणीय ज्यांची गुरुजींच्या जीवनात खूप मोठी जागा आहे, ते म्हणजे आदरणीय राजाराम महाराज गंडे. आदरणीय, दत्तात्रय महाराज फरांदे. वै.श्रीधर महाराज नागप. भागवत महाराज बोराडे .कल्याण महाराज तिडके. मोहन महाराज घुले.कृष्णा महाराज राऊत. कृष्णा महाराज काकडे.
अशी अनेक प्रेमाची, दिग्गज माणसं या यात्रेला आली आणि आनंदामध्ये भर पाडली.
यात्रेला आलेल्या प्रत्येकाने तण, मन, धनाने मदत केली. यामध्ये आपल्या गुरुजींचे विद्यार्थी. न थांबता. न थकता प्रत्येक कामात पुढे.
कधी विचार पण केला नव्हता. कि आपणही आगऱ्याला जाऊ, ताज महल पाहू, ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलं होत, ती ऐतिहासिक वस्तू म्हणजे लाल महाल पहायला मिळेल.
ज्या ठिकाणांची फक्त नाव ऐकली होती. त्या ठिकाणी आपणही जाऊ शकतो असं कधी वाटलं नव्हतं. पण गुरुजींमुळे हे शक्य झालं.
आजही ती यात्रा आठवली कि मनामध्ये आनंदाची उर्मी फुटते. कारणं या यात्रेमध्ये गेल्यावर अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेक स्नेहाची माणसं जोडली गेली. नियोजन कस करायचं, हे गुरुजींकडून शिकायला मिळालं. आपल्या सोबत, आपल्या भरवशावर आलेल्या माणसांना कस सांभाळायचं, त्यांची काळजी कशी घ्यायची, हे गुरुजींकडून शिकायला मिळालं.
यात्रेला आलेल्या आदरणीय महाराज मंडळींनी प्रत्येकाला भजनामध्ये न्हाऊन काढलं. भजनामध्ये पण किती आनंद आहेत हे शिकवलं. आणि यात्रेला आलेल्या प्रत्येकाला, आपल्या लाडक्या नवल भाईंनी, आपल्या हातामध्ये असलेल्या अन्नपूर्णा मातेच्या कृपेनें सर्वाना तृप्त केल.
यात्रेला आलेल्या प्रत्येकाला, यात्रेची सुरुवात झाल्यापासून ते यात्रेची शेवट होईपर्यंत एकच गोष्ट मिळाली. ती म्हणजे आनंद.
यामध्ये अजून एक आश्चर्य म्हणजे आपल्या यात्रेतील भव्यदिव्य मिरवणूक. दोन हजार भाविक आणि तेही एकदम शिस्तीचं पालन करत अशी भव्यदिव्य मिरवणूक काढू शकतात हे आपल्या यात्रेमुळं कळालं. एवढंच नाही, वृंदावन मधील आदरणीय व्यक्तींनीही आपल्या यात्रेचं कौतुक कराव म्हणजे अभिमानाचीच बाब नाही का.
अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपला लाडका माऊली. एवढ्या कमी वयात, ज्या वयामध्ये मुलांना स्पष्ट उच्चार काढता येत नाही. ज्या वयामध्ये मुलं फक्त खेळायच करतात. त्या वयामध्ये हा छोटा मुलगा गायन करतो, तेही स्वतः पेटी वाजवून, एवढ्या कमी वयामध्ये, एवढ्या मोठ्या समाजात, मोठ्या निर्भयतेने, मोठ्या उत्साहाणें, एवढं सुंदर गायन करून सर्वांना तृप्त करतो. हा आपल्या यात्रेमध्ये चर्चेचा विषय ठरला.
एवढ्या कमी वयात, एवढं यश संपादन करणाऱ्या आपल्या माऊलीच्या या यशाच संपूर्ण श्रेय, गुरुजी आणि ताईंना जातं. आज माऊली एवढ्या कमी वयात, एवढ्या चांगल्या प्रकारे यश संपादन करतोय. हे सुद्धा एक नवलच नाही का.
घरामध्ये आपल्याला माणसं सांभाळता सांभाळता नाकीनऊ येतात. पण यात्रेला आलेल्या दोन हजार माणसांना गुरुजींनी आपल्या अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं.
फारच सुंदर....👌👌👌
उत्तर द्याहटवा👍👍🔥
उत्तर द्याहटवाSuper
उत्तर द्याहटवा👍👌👌
उत्तर द्याहटवाKhup Chan Vaibhav Maharaj..🥰❤️❤️
उत्तर द्याहटवाखूप छान महाराज
उत्तर द्याहटवाराधे राधे 👌
उत्तर द्याहटवाNice Mharaj
उत्तर द्याहटवाखुप सुंदर....!🌹🙏
उत्तर द्याहटवाखुप सुंदर 🙏🌹
उत्तर द्याहटवा